उद्यापासून शताब्दी क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ

मुंबई क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षांखालील संघासाठी निवड चाचणी स्पर्धेचा दर्जा मिळालेल्या तिसऱया शताब्दी चषक दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेला गुरुवार, 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. 103 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या स्पार्ंटग क्लब कमिटीतर्फे ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विलास जोशी यांनी सांगितले. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत स्पार्ंटग क्लब कमिटीचे सचिव विकास रेपाळे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱया या स्पर्धेत 19 संघांना प्रवेश देण्यात आला आहे. उपांत्यपूर्व फेरीपासून स्पर्धेतील लढती दोनदिवसीय खेळवण्यात येतील. यजमान स्पार्ंटग क्लब कमिटी विरुद्ध विजय क्रिकेट क्लब या लढतीसह मुंबईतील एकूण सात मैदानांवर स्पर्धेच्या शुभारंभी लढती खेळल्या जातील.
Comments are closed.