डायपर किती वेळाने बदलावे? डॉक्टरांनी सांगितलाय डायपर बदलण्याचा नियम
नवजात बाळाची काळजी घेणे तारेवरच्या कसरतीप्रमाणे असते. बाळाला केव्हाही भूक लागते, केव्हाही सू-शी होऊ शकते. अशा वेळी बरेच पालक बाळांना डायपर घालतात. डायपरमुळे पालकांचे काम थोडे हलके होते. डायपरमुळे वारंवार बाळाने सू-शी केली की नाही, याकडे लक्ष द्यावे लागत नाही, कपड्याप्रमाणे वारंवार डायपरला धुवावे लागत नाही. डायवरचे इतके फायदे असूनही बाळाला डायपर घालताना तुमच्याकडून झालेली एक चूक बाळाच्या त्वचेसाठी नक्कीच हानिकारक ठरू शकते. पण, कशी? तज्ज्ञ याविषयी काय सांगतात? जाणून घेऊयात डॉक्टरांनी सांगितलेले डायपर वापरण्याचे नियम
तज्ज्ञांच्या मते, डायपर हे मुलांसाठी नाही तर पालकांसाठी फायदेशीर असते. कारण त्यांची शी- सू चे कपडे पालकांना वारंवार बदलावे लागत नाहीत. डायपर हा एक प्रकारचा फॉइलसारखा असतो ज्यात कापूस भरलेला असतो. हा कापूस बाळाची सू शोषून घेतो. त्यामुळे डायपरचा उपयोग हा मुलांपेक्षा पालकांसाठी अधिक सोयीचा असतो, असे असले तरी बाळाला जास्त काळ डायपर घालणे योग्य नाही.
हेही वाचा – मुलांमध्ये बुद्धिमत्ता नेमकी कोणाकडून येते आई की बाबा? संशोधन सांगतं खरी गोष्ट
डायपर घातल्याने उद्भवतात या समस्या –
- बाळाला सतत डायपर घातल्याने त्वचेवर ओलावा राहतो, ज्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते.
- घरात असताना बाळाला डायपर घालू नये. तुम्ही प्रवासासाठी जाणार असाल तर एकवेळ डायपर घालू शकता.
- डायपरमध्ये सिंथेटिक फायबर रंग, केमिकल्स असतात. या केमिकल्समुळे सेन्सिटिव्ह त्वचेचे नुकसान होऊ शकते.
- डायपरमुळे युरिनरी इन्फेक्शन होऊ शकते.
- सतत डायपर घातल्याने त्वचेवर पुरळ उठू शकते.
- डायपर घातल्याने नैसर्गिकरित्या सू सू करण्याची सवय बिघडू शकते.
डायपर घातल्यास किती वेळाने बदलावे?
तज्ज्ञांच्या मते, डायपर दर 3 ते 4 तासांनी बदलावे. डायपर खराब झाले नसेल तरीही बदलावे. डायपरबाबत हा नियम नियमित पाळल्यास बाळाच्या आरोग्यावर आणि त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका संभवत नाही.
कोणते डायपर खरेदी कराल?
- डायपरचे मटेरियल मऊ आणि फ्लफी असणे आवश्यक आहे. अशा डायपरमुळे बाळाच्या त्वचेला नुकसान पोहोचत नाही.
- लूज डायपर किंवा जास्त घट्ट डायपर खरेदी करू नये. योग्य आकाराचे डायपर खरेदी करावे.
- डायपर खरेदी करताना त्यात सूपर्ब अब्जार्ब क्वालिटी आहे का? हे तपासून घ्यावे.
हेही वाचा – ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना होऊ शकतात हाडांचे आजार
Comments are closed.