देशात जन्मलेल्या मुलांची संख्या कमी झाली आहे.
2023 मध्ये 2.6 कोटी मुलांचा जन्म : 2022 च्या तुलनेत आकडा 2.32 लाखाने कमी : लोकांच्या मृत्यूचा आकडा वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमवर (सीआरएस) आधारित ‘वायटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया’च्या जारी अहवालानुसार भारतात 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये जन्मलेल्या मुलांच्या संख्येत घट झाली आहे, परंतु मृत्यूचा आकडा वाढला आहे. अहवालानुसार 2023 मध्ये 2 कोटी 52 लाख मुलांचा जन्म झाला होता. 2022 च्या तुलनेत हा आकडा 2 लाख 32 हजारांनी कमी होता. कारण 2022 मध्ये 2 काटी 54 लाख 32 हजार मुलांनी भारतात जन्म घेतल होता.
2023 मध्ये 86.6 लाख लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर 2022 मध्ये हा आकडा 86.5 लाख राहिला होता. अहवालानुसार 2023 मध्ये सर्वात कमी जन्म लिंग गुणोत्तर झारखंडचे राहिले आहे. येथे दर 1100 मुलांमागे 899 मुलींच्या जन्माची नोंद झाली आहे. याप्रकरणी दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून तेथे हा आकडा 900 इतका आहे. तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा 906, चौथ्या स्थानावर महाराष्ट्र 909, पाचव्या स्थानावर गुजरात 910, सहाव्या स्थानावर हरियाणा 911, तर सातव्या स्थानावर मिझोरम असून तेथे लिंग गुणोत्तर प्रमाण 911 इतके आहे.
सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रकरणी अरुणाचल प्रदेश पहिल्या स्थानी आहे. अरुणाचल प्रदेशात दर 1000 मुलांमागे 1085 मुलींनी जन्म घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागालँड 1007 मुलींच्या जन्मासह आहे. तर दर 1000 मुलांमागे गोव्यात 973 मुलींनी जन्म घेतल्याने हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावर लडाख-त्रिपुरा 972 संख्येसह आहे. तर 967 संख्येसह केरळ पाचव्या स्थानावर आहे.
सर्वाधिक जन्म नोंदणी
ओडिशा, मिझोरम, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशात जन्म नोंदणी 80-90 टक्के राहिली आहे. तर 14 राज्यांमध्ये आसाम, दिल्ली, मध्यप्रदेश, त्रिपुरा, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, बिहार, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, मेघालय आणि उत्तरप्रदेशात जन्म नोंदणी 50-80 टक्क्यांदरम्यान राहिली आहे. 11 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांनी निर्धारित 21 दिवसांच्या आत 90 टक्क्यांहून अधिक जन्मनोंदणी गाठली आहे. या राज्यांमध्ये गुजरात, पुडुचेरी, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण अँड दीव, तामिळनाडू, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटसमूह, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गोवा आणि पंजाब सामील आहे.
2023 मध्ये एकूण नोंद झालेल्या जन्मांमध्ये संस्थात्मक जन्मांचा (रुग्णालयात झालेले जन्म) हिस्सा 74.7 टक्के राहिला. परंतु अहवालात सिक्कीमचा डाटा सामील करण्यात आलेला नाही. पूर्ण देशात जन्मांची एकूण नोंदणी 98.4 टक्के राहिली आहे.
Comments are closed.