खारघरवासीयांचे पाणी तळोजाला; पाणीटंचाईने नागरिक त्रस्त

खारघर वसाहतीतील सेक्टरना दररोज ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. पण शहराला ७२ एमएलडीच पाणीपुरवठा होत असून उर्वरित पाणी तळोजा वसाहतीला पुरवले जात आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पनवेल पालिकेत येणाऱ्या खारघरला पाणीपुरवठा करण्याचे काम सिडको करते. पण खारघरला सध्या ७२ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस शहराला पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप होत असून पाणीटंचाईचा व्हॅलिशिल्प, स्वप्नपूर्ती अशा मोठ्या गृहसंकुलांना फटका बसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी सिडको तसेच रायगड भवन येथे हंडा मोर्चा काढत महिलावर्गाने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. पण पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.
Comments are closed.