पहिल्याच दिवशी दमदार फलंदाजी! ईशान किशन, गायकवाडचे मुख्य निवडकर्त्यांना जबरदस्त उत्तर

2025-26 रणजी ट्रॉफी (Ranji trophy 2025- 26) 15 ऑक्टोबर रोजी सुरू झाली, ज्यामध्ये अनेक स्टार खेळाडू मैदानावर होते. हंगामाच्या पहिल्याच दिवशी काही स्टार खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन (Ishaan kishan) आणि सीएसके कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) हे खेळाडूंमध्ये आहेत. दोन्ही खेळाडूंनी कठीण परिस्थितीत फलंदाजी करून आपल्या संघाचा सन्मान वाचवला. त्यांनी मोठ्या धावा करून भारतीय संघ निवडकर्त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. गायकवाड पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. महाराष्ट्राने 18 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी माजी कर्णधार गायकवाडने जबाबदारी स्वीकारली आणि 91 धावांची शानदार खेळी केली, त्याला जलज सक्सेनाने 49 धावांची साथ दिली. गायकवाडच्या खेळीमुळे महाराष्ट्राला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. रुतुराज सध्या तिन्ही स्वरूपात भारतीय संघातून अनुपस्थित आहे. सध्या गायकवाडला इंडिया अ मध्येही संधी मिळत नाही.

यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन देखील बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. सध्या भारतीय निवड समिती त्याला कसोटी क्रिकेटमध्ये एन. जगदीसनच्याही मागे स्थान देत आहे. अशा परिस्थितीत, त्याने झारखंडकडून तामिळनाडूविरुद्ध शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी झारखंडचा कर्णधार इशान किशन 125 धावांवर खेळत होता, तर साहिल राज त्याला 64 धावांसह साथ देत आहे. जेव्हा किशन फलंदाजीसाठी आला तेव्हा संघ अडचणीत सापडलेला दिसत होता. त्यावेळी किशनने जबाबदारी घेत शानदार फलंदाजी केली.

Comments are closed.