सुरेश रैना पासून डेविड वॉर्नरपर्यंत, ऑस्ट्रेलिया दौर्यात या महान खेळाडूंच्या आवाजाने कमेंट्री बॉक्स गाजणार
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला आता फक्त 3 दिवसांचा अवधी उरला आहे. पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला पर्थ येथे खेळवला जाणार आहे. वनडेनंतर टी20 मालिका देखील आयोजित केली जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनामुळे ही मालिका विशेष ठरणार आहे. आता कमेंट्री पॅनेलमध्येही अनेक मोठी नावे झळकणार आहेत. सुरेश रैना आणि डेविड वॉर्नर या मालिकेदरम्यान कमेंट्री करताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच रवि शास्त्री आणि आकाश चोप्रादेखील पॅनेलमध्ये असतील.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर हिंदी कमेंट्री पॅनेलमध्ये सुरेश रैना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत इरफान पठाण आणि आकाश चोप्रा यांच्यावरही संपूर्ण जबाबदारी राहणार आहे. ब्रॉडकास्टर म्हणून जतिन सप्रू आणि अनंत त्यागी यांची जागा पक्की दिसत आहे. अभिषेक नायर आणि पार्थिव पटेलदेखील हिंदी पॅनेलमध्ये दिसणार आहेत. इंग्रजी कमेंट्री पॅनेलबद्दल बोलायचे झाले तर तिथे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व दिसत आहे.
रवि शास्त्री, रॉबिन उथप्पा आणि अभिनव मुकुंद यांच्यासोबत 7 ऑस्ट्रेलियन दिग्गजही कमेंट्री पॅनेलमध्ये दिसणार आहेत. त्यामध्ये गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, माईक हसी यांच्याबरोबरच डेव्हिड वॉर्नर देखील दिसणार आहे. याशिवाय शेन वॉटसन, अॅरॉन फिंच आणि मार्क वॉ हेही आपल्या आवाजाचा जादू दाखवणार आहेत. या खेळाडूंनी निवृत्तीनंतर कमेंट्री पॅनेलमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. फॅन्सच्या नजरा सर्वाधिक सुरेश रैना आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर असणार आहेत.
Comments are closed.