अभिनेते पंकज धीर यांचे निधन, ‘महाभारता’तील कर्ण काळाच्या पडद्याआड

बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर (68) यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्परोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी विलेपार्ले येथील पवनहंस येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी
बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते.

अभिनेते पंकज धीर हे उत्तम अभिनय आणि भारदस्त आवाजासाठी ओळखले जायचे. त्यांनी चंद्रकांता, युग, द ग्रेट मराठा आणि ससुराल सिमर का यासारख्या मालिकांमध्ये तसेच आशिक आवारा, सडक, सोल्जर आणि बादशाह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना खरी प्रसिद्धी ‘महाभारत’मधील कर्णाच्या भूमिकेमुळे मिळाली होती. पंकज धीर यांचा मुलगा निकितीन धीर इंडस्ट्रीत काम करत असून त्याची पत्नी पृतिका सेंगरसुद्धा अभिनेत्री आहे.

महाभारताच्या शूटिंगवेळी डोळ्यात बाण लागला

एका मुलाखतीत पंकज धीर यांनी खुलासा केला की, महाभारत या शोचे चित्रीकरण करताना त्यांच्या डोळ्यात बाण लागला होता. त्यानंतर डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यांनी स्पष्ट केले की, बी.आर. चोप्रा यांनी वास्तववादी युद्धदृश्ये तयार करण्यासाठी जड शस्त्रांचा वापर केला, ज्यामुळे सेटवर अनेक कलाकारांना गंभीर दुखापत झाली.

Comments are closed.