हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी दिलं आश्वासन; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानबाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्याचे ट्रम्प म्हणाले. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.
#पाहा | “होय, नक्की. ते (PM नरेंद्र मोदी) माझे मित्र आहेत. आमचे चांगले नाते आहे… भारत तेल खरेदी करत आहे याचा मला आनंद नव्हता. आणि त्यांनी आज मला आश्वासन दिले की ते रशियाकडून तेल विकत घेणार नाहीत. हा एक मोठा थांबा आहे. आता आपल्याला चीनला तेच करायला लावायचे आहे…”… pic.twitter.com/xNehCBGomR
— ANI (@ANI) १५ ऑक्टोबर २०२५
Comments are closed.