Mahim Kandil Galli : दिवाळीनिमित्त सजली माहिमची कंदील गल्ली
मुंबई : दिवाळी हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि रंगीबेरंगी कंदिलांच्या झगमगाटाशिवाय अपूर्णच आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुंबई येथील माहीमच्या कवळी वाडी येथील “कंदील गल्ली” पुन्हा एकदा सजली आहे. कंदील, रांगोळी, सुंगधी उटणे, पणत्या आणि दिवे घेण्यासाठी दूरवरून नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.
माहीमची कंदील गल्ली जवळपास 50 वर्षांहून अधिककाळ अस्तित्वात आहे.
दिवाळीच्या दोन आठवडे आधीच माहीमची कवळीवाडी कंदिलांनी उजळून निघते.
कंदील गल्लीत पारंपरिक कंदील, कार्डबोर्ड, फ्लॉवर वॉल, बटरफ्लाय कंदील, आकाशदीप कंदील, करंजी कंदील, मटका बटर कंदील आदी कंदील पाहायला मिळतात.
गणपती विसर्जनानंतर माहीमच्या कंदील गल्लीतील प्रत्येक घर दिवाळीच्या काही दिवस आधीच कार्यशाळा बनतं.
हातात कात्री, गोंद, रंगीत कागद, बांबू आणि दिवे या सगळ्यांनी एक रंगीबेरंगी सृजन सुरू होतं.
छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र बसून काम करतात.
काही कंदील 25 रुपयांना मिळतात, तर मोठे आकर्षक कंदील 700-900 रुपयांपर्यंत जातात.
Comments are closed.