तुम्हाला चादर घेतल्याशिवाय झोप येत नाही? हा असू शकतो मानसिक त्रास
बरेच जण असे असतात ज्यांना अंगावर चादर घेतल्याशिवाय झोपच येत नाही. गर्मीच्या दिवसांतही ही मंडळी अंगावर चादर घेतल्यावरच झोपतात. असेही काही जण असतात जे हात, पाय ब्लॅंकेटच्या बाहेर काढून झोपतात पण तरीही त्यांना ब्लॅंकेट हे लागतंच. पण मानसशास्त्र तज्ञांच्या मते, तुम्ही मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे ही सवय असते. ( Why some people can’t sleep without blanket ? )
खरे तर, काही लोकं चादर ही थंडीपासून बचावासाठी नव्हे तर सुरक्षिततेची भावना अनुभवण्यासाठी घेतात. मानसशास्त्र तज्ञांच्या मते, जे लोक भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात त्यांना ही सुरक्षिततेची भावना महत्त्वाची वाटते. चादर घेतल्याने त्यांना आरामदायी आणि सुरक्षित वाटते. तसेच मानसशास्त्रानुसार, नवजात बाळांना कायम उबदार कपड्यात गुंडाळून ठेवले जाते. हीच सुरक्षिततेची भावना काही लोकांमध्ये कायम राहते आणि त्यामुळे त्यांना झोपताना चादर घेण्याची सवय असते. चादरीसोबतच काही लोकं त्यांच्या ठराविक उशीशिवायही झोपू शकत नाहीत.
हीही प्रमुख कारणे:
आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी होते आणि चादर घेतल्याने उबदार वाटते.
काही अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, चादर घेतल्याने सेरोटोनिन आणि मेलाटोनिन नावाचे हार्मोन्स उत्तेजित होतात. ज्यामुळे झोपेला प्रोत्साहन मिळते.
ब्लँकेट घेऊन झोपणे हे सवयीचा भाग असू शकते. काहींसाठी, ब्लँकेटशिवाय झोपणे अवघड झालेले असते.
चादर घेऊन झोपणे सर्केडियन लयचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपले शरीर कधी झोपायला आणि जागे व्हायला तयार आहे हे ठरवण्यासाठी मदत होते.
जर्नल ऑफ स्लीप मेडिसिन अँड डिसऑर्डर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की जाड ब्लँकेट घेऊन झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.
अमेरिकन जर्नल ऑफ ऑक्युपेशनल थेरपीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की चिंताग्रस्त लोकांसाठी ब्लॅंकेट घेऊन झोपणे फायद्याचे ठरते. यामुळे त्यांना चांगली झोप लागते.
Comments are closed.