दिवाळीपूर्वीच शेअर बाजार बनला रॉकेट! निफ्टी, सेन्सेक्सची जबरदस्त उसळी

दिवाळीच्या आधीच शेअर बाजाराने दिवाळी साजरी केल्याचे दिसत आहे. गुरुवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्दशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी रॉकेटप्रमाणे झेप घेतली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही जबरदस्त तेजी दाखवली आहे. दुपारी १:०० वाजेपर्यंत, निफ्टी 190 अंकांनी वाढून २५,५१२.९५ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ६२० अंकांनी वाढून ८३,२२० वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी ४१८ अंकांनी वधारला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ झाली.

बीएसईमध्ये चार वगळता इतर 26 शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. इन्फोसिस, सन फार्मा, टीसीएस आणि टेक महिंद्रा वगळता, इतर सर्व शेअर्स तेजीत आहेत. या वाढीत टायटन २.५% वाढून ₹३,६३८ वर व्यवहार करत आहे. हा टॉप गेनर ठरला आहे. बीएसईवरील ४,२०७ सक्रिय शेअर्सपैकी २,३५४ शेअर्स तेजीत आहेत. तर १,६८६ शेअर्स घसरले आहेत. १६७ शेअर्स स्थिर आहेत. १४७ शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि ७६ शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. १८७ शेअर्स अप्पर सर्किटवर आहेत आणि १४७ शेअर्स लोअर सर्किटवर आहेत.

लार्ज-कॅप शेअर्समुळे बाजारात तेजी दिसत आहे. टायटन आणि बँक शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली आहे. कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एसबीआय सारख्या बँकिंग शेअर्समध्ये 2.5% पर्यंत वाढ झाली आहे. यूएस फेडकडून दर कपातीची अपेक्षा वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही चांगली वाढ दर्शवत आहे. त्यामुळे शेअर बाजाराने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली आहे.

Comments are closed.