अभिषेक शर्माला मिळाली आनंदाची बातमी, आयसीसीने केली मोठी घोषणा
आशिया कप 2025 मध्ये अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली होती. त्याने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. आशिया कप 2025 मध्ये धुमाकुळ घातल्यानंतर आता अभिषेक शर्माला मोठा पुरस्कार मिळाला आहे. आयसीसीने याची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसीने अभिषेकला ‘प्लेयर ऑफ द मंथ’च्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अभिषेकशिवाय स्मृति मानधनाला महिला वर्गासाठी आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार मिळाला आहे. तिनेही सप्टेंबरमध्ये शानदार फलंदाजी केली होती. विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तिने कमालची फलंदाजी सादर केली होती.
आयसीसीचा पुरस्कार जिंकून खूप छान वाटत आहे आणि मला आनंद आहे की हा पुरस्कार मला काही महत्वाच्या सामन्यांसाठी मिळाला, जिथे मी विजय मिळवण्यास मदत करू शकलो. अशी प्रतिक्रिया स्मृती आणि अभिषेकने दिली आहे.
मला त्या संघाचा भाग असल्याचा अभिमान आहे जो सर्वात कठीण परिस्थितींमध्येही विजय मिळवू शकतो. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमचा अलीकडचा रेकॉर्ड आमच्या सकारात्मक विचारसरणीचे दर्शन घडवतो.
त्याचप्रमाणे स्मृती मानधनाने सांगितले की, सप्टेंबर 2025 साठी आयसीसी महिला ‘प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार मिळाल्याने मला खरोखरच सन्मानित वाटत आहे. अशा प्रकारचा सन्मान मला एक खेळाडू म्हणून पुढे वाढण्यास आणि विकसित होण्यास प्रेरित करतो.
Comments are closed.