भारतीय संघाला मिळाली नवीन जर्सी, जाणून घ्या काय झाले बदल

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे, जिथे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांचे पुनरागमन होत आहे. मालिकेचा पहिला सामना 19 ऑक्टोबरला पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाची नवी जर्सी समोर आली आहे. या जर्सीमध्ये एक बदल दिसून आला आहे. तो म्हणजे जर्सीवरून ड्रीम-11 या स्पॉन्सरचे नाव हटवण्यात आले आहे, कारण आता ड्रीम-11 भारतीय संघाचा प्रायोजक राहिलेला नाही.

आशिया कप 2025 पूर्वी बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील करार संपला होता. त्यापूर्वी ड्रीम-11 ही भारतीय संघाची स्पॉन्सर होते, त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीवर ड्रीम-11 असं लिहिलेलं असायचं. पण आशिया कप 2025 दरम्यान टीम इंडिया कोणत्याही स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरली होती. मात्र वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला अपोलो टायर्स या नव्या टायटल स्पॉन्सरची साथ मिळाली. आणि आता भारतीय संघाची नवी वनडे जर्सीही समोर आली आहे, ज्यावर अपोलो टायर्स असे लिहिलेले आहे.

भारत सरकारने ड्रीम-11सारख्या अनेक अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली होती, कारण या अ‍ॅप्सवर लोक पैसे लावून स्वतःचा संघ तयार करत होते आणि लोभाच्या नादात अनेकांना मोठे नुकसानही होत होते. मात्र आता ड्रीम-11वर टीम तयार करता येते, पण त्यावर पैसे लावता येत नाहीत. यानंतर अपोलो टायर्स या कंपनीच्या रूपाने भारतीय संघाला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. बीसीसीआयने अपोलो टायर्ससोबत तब्बल 579 कोटी रुपयांचा करार केला आहे, जो पुढील 2.5 वर्षे चालणार आहे.

Comments are closed.