बेस्ट बसेस वाढवाव्या आणि तिकीट दर कमी करावे, आदित्य ठाकरे यांची मागणी

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना अजूनही बोनस मिळालेला नाही तो लवकरात लवकर मिळावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच बेस्ट बसची दरवाढ कमी करून बसची संख्या वाढवावी असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, आज दिवाळी सुरु होऊनही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही हक्काचा ‘बोनस’ मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी हा बोनस अत्यावश्यक असतो. आमची मागणी आहे की मागच्या वर्षाहूनही अधिक रकमेचा बोनस महानगरपालिकेच्या व बेस्टच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून तत्काळ मिळायला हवा. महानगरपालिकेची मदत बेस्टला लागेल हे जरी सत्य असलं तरी ती करणं हे महानगरपालिकेचं कर्तव्यच आहे!
आणि मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना तत्काळ बोनस मिळावा, अशा आमच्या मागणी सोबतच अजून एक मागणी आहे, सामान्य मुंबईकरांसाठी!
महानगरपालिकेने अजून काही पैसे खर्च करुन बेस्टची दरवाढ कमी करावी आणि मुंबईकरांना परवडेल असे तिकिट दर ठेवावेत, तसेच बेस्टच्या ताफ्यात वाढ करुन मुंबईकरांसाठी चांगल्या व परवडेल अशा दळणवळणाची सोय करावी. दिवाळी काळात मुंबईकरांसाठी हीच महत्वाची भेट ठरेल! असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आज दिवाळी सुरु होऊनही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही हक्काचा ‘बोनस’ मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी हा बोनस अत्यावश्यक असतो. आमची मागणी आहे की मागच्या वर्षाहूनही अधिक रकमेचा बोनस…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 17 ऑक्टोबर 2025
Comments are closed.