Diwali Health Tips: सण- उत्सवाच्या काळात वजन कसे नियंत्रणात ठेवावे?

दिवाळीचा सण म्हंटलं की फराळाचे पदार्थ, गोडधोड, तेलकट पदार्थ जास्त खाल्ले जातात. तसेच या उत्सवाच्या काळात आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो, रात्री उशिराने जेवतो. परिणामी त्याचे आरोग्यावर अनपेक्षित परिणाम होतात. जसे की, अचानक वजन वाढते. कारण जेवणाची वेळ ही चयापचय कार्यक्षमतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. रात्री उशिरा आणि जास्त जेवणे हे शरीरीक चक्रात व्यत्यय आणते. मग अशा वेळी या काळात वजन कंट्रोलमध्ये कसे ठेवायचे? हेच आपण जाणून घेऊया…

रिकाम्या पोटी घ्या पौष्टिक आहार
अनेकदा सणाच्या काळात घाईघाईमध्ये ब्रेकफास्ट स्किप होतो. मात्र असे करणे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी फळे, ओट्स किंवा एक स्मूदी घ्यावी. जेणेकरून शरीराला दिवसभर ऊर्जा मिळेल.

हालचाल महत्त्वाची
या काळात शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे. जड आणि गोडधोड पदार्थ खाल्ल्याने आळस येतो, अशा वेळी झोपण्यापेक्षा फिरायला जा. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि आळसही जातो.

खाण्यावर नियंत्रण
सणांच्या काळात सर्व पदार्थ हे चविष्ट असतात. यामुळे अनेकदा प्रत्येकाच्या जिभेचा ताबा सुटतो. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पोट भरेल इतकाच आहार घ्यावा.

साखरेचा कमी वापर
गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ, सुकामेवा किंवा खजूर वापरून मिठाई तयार करावी.

पाणी आणि झोप
डिहायड्रेशन आणि झोपेचा अभाव ही वजन वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. सणाच्या दिवसांत उशिरापर्यंत जागल्याने चयापचयवर परिणाम होतो. म्हणून, दररोज किमान ७ तास झोप आणि ८-१० ग्लास पाणी प्यायला हवे.

Comments are closed.