IND vs AUS : इरफान पठाणचा सरप्राइज संघ जाहीर, गंभीरचा फेव्हरेट खेळाडू प्लेइंग इलेव्हन मध्ये

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानं आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलवर भारताचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. या संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, सर्वात मोठी चर्चा आहे ती हर्षित राणा या तरुण वेगवान गोलंदाजाची.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा देखील संघात समावेश करण्यात आला असून, ते आपल्या अनुभवाने संघाला मजबूत करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.

इरफान पठाणनं निवडलेल्या संघात रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीवीर असतील. त्यांच्यानंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांची क्रमवारी आहे. ऑलराऊंडर म्हणून नितीशकुमार रेड्डी आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांचा विचार करता, पठाणनं मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना गोलंदाजी विभागात संधी दिली आहे. फिरकी विभागाची जबाबदारी कुलदीप यादवकडे देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, हर्षित राणा याला संघात स्थान देताना इरफान पठाण म्हणला, “ मला वाटतं हर्षित राणाला संधी मिळेल, या संघात तो एकमेव गोलंदाज आहे जो बॅटिंग करु शकतो. त्याला आठव्या स्थानावर खेळवता येईल. मी त्याला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रुपात पाहतो. हर्षित राणा चांगली कामगिरी करु शकतो,त्याला चांगली संधी आहे, असं इरफान पठाण म्हणाला.

Comments are closed.