जळगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा; शिवसेनेच्या किशोर पाटील पाठोपाठ भाजपचाही स्वबळाचा नारा
जळगाव वार्ता: जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Appa Patil) यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर, भाजपनेही (BJP) आता स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना (Shivsena) आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून जळगावमध्ये निवडणुकांपूर्वीच महायुती फिसकटली असून पाचोरा – भडगाव मतदारसंघात शिवसेना व भाजपचा जाहीरपणे स्वतंत्र लढण्याचा राज्यातला पहिला निर्णय असल्याचे बोललं जात आहे.
Mahayuti : युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ राज्यात पहिला
पाचोरा – भडगाव मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने भाजपच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात युती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे. किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे. पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हीही एकटे लढणार आहोत. अशी भूमिका मंगेश चव्हाण यांनी मांडली आहे.
किशोर आप्पा पाटील यांच्यावर मंगेश चव्हाण : नोंदणी हे हरिभक्त पायणाचे काम आहे.
राजकारणात कोणी कोणाचं मित्र आणि शत्रू नसतं. राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो, तो परवाचा मित्रही असू शकतो. राजकारण हे हरिभक्त पारायणचे काम नाही, राजकारणात कोणीतरी शत्रू राहील, कुणीतरी सोबत राहणार. किशोर पाटील आणि मी सरकारमध्ये आहे, महायुतीचा घटक आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी अगदी टोकाचे बोलणं मला योग्य वाटत नाही. किशोर पाटील यांनीही काही गोष्टी सांभाळून बोलल्या तर बरं होईल. विधानसभेला त्यांचा फॉर्म भरायला मी ज्युनिअर आमदार असताना आलो होतो. ते एकही उदाहरण दाखवू शकत नाही की आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. असे म्हणत भाजप आमदार मंगेश चव्हाण (मनसे चव्हाण)ni शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना टोला लगावला.
पक्ष वाढवण्यासाठी जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन काम करावे लागेल. आमच्या सोबत जे लोक येतील, आमच्या विचारांशी अनुरूप असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. युतीत लढण्याविषयी मी किशोर पाटील यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडून नकार आल्यानंतर आम्हाला प्रस्ताव पुढे न्यावा लागत आहे. त्यांचा निर्णय झाल्यामुळे किशोर पाटील वेगळे लढत आहे आणि आम्ही वेगळे लढत आहोत. यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघात भाजप आणि शिवसेना वेगवेगळे स्वबळावर लढणार आहे. हे चित्र फक्त पाचोरा आणि भडगाव मतदार संघात पुरता मर्यादित आहे. जिल्हा संदर्भात अजून नेत्यांनी कुठलेही भूमिका स्पष्ट केलेले नाही. असेही भाजपचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.
Mangesh Chavan : आमच्याकडून कधीही सर्वांसाठी युतीचे मार्ग खुले
किशोर पाटील यांच्या विषयी मला गिरीश भाऊंनी आणि पक्षाने जे जे सांगितलं मी ती भूमिका पार पाडली. एखाद्या व्यक्तीची बंडखोरी म्हणजे पक्षाची बंडखोरी नाही. भारतीय जनता पार्टीच्या 20 कार्यकर्त्यांपैकी 17 कार्यकर्त्यांनी किशोर पाटलांचे काम केले आहे. कितीतरी आमचे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांनी त्यांचं काम केलं आहे. किशोर पाटील यांचा समज गैरसमजातून निर्माण झाला आहे. त्याला आपण काय करणार. आमच्याकडून कधीही सर्वांसाठी युतीचे मार्ग खुले असतात. किशोर पाटील यांनी काही प्रस्ताव दिला, पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते. असेही मंगेश चव्हाण म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.