अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील 3 उगवते तारे पाकड्यांच्या हल्ल्यात मारले गेले, राशिद खान संतापून म्


अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान युद्धात तीन क्रिकेटपटू ठार : पाकिस्तान हा असा देश आहे जो नेमहीच काहीतरी कुरापती काढत असतो. पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध ताणलेले आहेत. दरम्यान, आता हाच पाकिस्तान अफगाणिस्तान या देशाशी भिडला. सध्या या दोन्ही देशांत संघर्ष चालू आहे. पाकिस्तानने अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात उरगुन जिल्ह्यातील तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तानच्या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू (Afghanistan vs Pakistan War Three Cricketers Killed)

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) शनिवारी पहाटे पुष्टी केली की, पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर बोर्डाने पुढील महिन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ACB ने याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर दिली. या हल्ल्यात प्राण गमावलेले क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून अशी त्यांची नावे आहेत. अफगाणिस्तान टी-20 संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू राशिद खान यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

राशिद खान काय म्हणाला?

अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यानेही आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं की,  अफगाणिस्तानवरील अलीकडील पाकिस्तानी हवाई हल्ल्यांत निरपराध नागरिकांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. ही एक अशी शोकांतिका आहे, ज्यात महिलांसह, लहान मुलं आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. जेथे लोक वस्ती आहे, अश्या ठिकाणी हल्ले करणे ही अत्यंत अमानुष आणि अनैतिक कृत्य आहे. मी पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यांतून माघार घेण्याच्या ACB च्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करतो. या कठीण काळात मी माझ्या देशवासीयांसोबत उभा आहे, आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही.”

तिरंगी टी-20 मालिकेमधून माघार (Afghanistan Boycotts Pakistan Tri-Series)

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत खेळाडूंना “अफगाण क्रिकेटचे भूमिगत हिरो” असे संबोधले. पक्तिका हल्ला आणि आपल्या देशातील खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार होती.

हे ही वाचा –

ICC Women World Cup 2025 Points Table : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय! टीम इंडियाला भरली धडकी, पाकिस्तानमुळे टॉप-4 मधून होणार बाहेर? जाणून घ्या गणित

आणखी वाचा

Comments are closed.