पाकड्यांनी लायकी दाखवलीच; अफगाणिस्तानच्या ‘त्या’ तीन खेळाडूंसोबत नेमकं काय घडलं?
पाकिस्तानी हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे ३ क्रिकेटपटू ठार गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे. या दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष सुरु आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 48 तासांची शस्त्रसंधी झाली होती. मात्र, शांततेच्या काळात कुरापती काढणे ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. त्यामुळे शस्त्रसंधी असूनही पाकिस्ताने अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ला केला. पाकिस्तानी हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यात घडली, जिथे अफगाण क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारूनसह आठ जणांचा मृत्यू झाला.
अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत नेमकं काय घडलं? (Afghanistan vs Pakistan War Three Cricketers Killed)
पक्तिका प्रांतात पाकिस्तानी हवाई हल्ल्याने अफगाण क्रिकेटला मोठा धक्का दिला आहे. यात तीन स्थानिक क्लब क्रिकेटपटू ठार झाले आणि चार जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमधील उगवते तारे असणारे हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराणा येथील स्थानिक स्पर्धेत मैत्रीपूर्ण सामना खेळून घरी परतत असताना ही घटना घडली. पाकिस्तानी हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाने त्यांच्या गाडीला लक्ष्य केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पाकिस्तानच्या या निर्दयी कृतीने केवळ अफगाणिस्तानच नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
शोक निवेदन
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंच्या दुःखद हौतात्म्याबद्दल तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त करतो, ज्यांना आज संध्याकाळी पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य केले गेले.
मध्ये… pic.twitter.com/YkenImtuVR
— अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (@ACBofficials) 17 ऑक्टोबर 2025
अफगाणिस्तानची तिरंगी टी-20 मालिकेतून माघार
या घटनेला प्रतिसाद म्हणून, एसीबीने नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेतून माघार घेण्याची घोषणा केली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे की, “पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य झालेल्या पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंच्या शहीदतेबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीव्र शोक व्यक्त करतो. आणि पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार होती.
पाकिस्तानच्या हल्ल्यात काबूलमधील शाळा अन् घरांचे नुकसान
तालिबानने आरोप केला आहे की, पाकिस्तानने बुधवारी काबूलवर दोन ड्रोन हल्ले केले. काबूल पोलिस प्रवक्ते खालिद झद्रान यांच्या मते, ड्रोनने एका घराला आणि बाजारपेठेला टार्गेट केले. हल्ल्यात किमान पाच लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. जवळच्या शाळेलाही याचा फटका बसला. त्यात 500 हून अधिक विद्यार्थी आणि अंदाजे 50 वर्गखोल्या आहेत. हल्ल्याच्या वेळी विद्यार्थी घरी गेले होते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.