८ तास झोप घेतल्यानंतरही थकवा, आळस का जाणवतो? ९९% लोकांना माहित नाही कारण

फिट अँड फाईन राहण्यासाठी केवळ संतुलित आहार महत्त्वाचा नाही, तर पुरेशी झोप घेणं देखील गरजेचे आहे. दररोज ८ तासांची झोप घेणं शरीरासाठी चांगलं असते. पण तुम्ही अनेकदा हे नोटीस केलं असेल की, ८ तास व्यवस्थित झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटते, आळसही जाणवतो. कमी झोपेमुळे असं होत असेल असा अनेकांचा समज असतो. पण ९९% लोकांना यामागचे खरं कारण नेमकं काय ते माहित नाही. ( Why do a person feel tired and sleepy even after 8 hours of sleep ? )

तुम्ही रात्री वेळेवर झोपता, पण तरीही सकाळी उठलं की शरीर जड पडते, थकवा येतो, आळस जाणवतो आणि कधी कधी डोकेदुखीही होते. केवळ तुम्हीच नव्हे तर जगभरातील लाखो लोक अशाच अनुभवातून जात आहेत. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, व्हिटॅमिनची कमी, हार्मोन असंतुलन, इलेक्ट्रोलाइटची कमतरता इ.

झोपेची गुणवत्ता
तुम्ही केवळ ८ तास झोप घेणं पुरेसे नसते. झोपेची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते. म्हणजेच तुम्ही रोज वेगवेगळ्या वेळी झोपत असाल तर शरीराचे जैविक घड्याळ बिघडते. यामुळे तुम्ही 8 तास झोपलात तरीही झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही. त्यामुळे झोपेची एकच वेळ पाळावी.

संप्रेरक असंतुलन
शरीरात हार्मोन्स असंतुलन निर्माण झाल्यास थकवा व आळस वाटू शकतो. विशेषतः कोर्टिसोल आणि मेलाटोनिन या संप्रेरकांमधील बिघाडामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

व्हिटॅमिन डी
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास झोपेचा त्रास होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा जाणवतो आणि जास्त झोप येऊ शकते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते.

इलेक्ट्रोलाइटची कमतरता
मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम हे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स झोपेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे असतात. या खनिजांची कमतरता असल्यास झोपमोड होते, वारंवार जाग येते. परिणामी दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि आळस जाणवतो.

व्हिटॅमिन बी १२
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील जास्त झोप येण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. जेव्हा व्हिटॅमिन बी १२ कमी असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप झोप येऊ लागते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे आळस येतो, दिवसभर झोप येते.

Comments are closed.