IND vs AUS: वनडे सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्या (19) रविवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. रोहित शर्माच्या जागी शुबमन गिल भारताचे नेतृत्व करेल आणि तो नवीन एकदिवसीय कर्णधार असेल. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध विजय मिळवणे कधीच सोपे नव्हते. येथे संघांना जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डवर एक नजर टाकूया.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 152 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे. कांगारू संघाने 84 सामने जिंकले आहेत, तर भारताने 52 सामने जिंकले आहेत. दहा सामने अनिर्णीत राहिले. दोन्ही संघांनी शेवटचा एकदिवसीय सामना मार्चमध्ये 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता, जो उपांत्य सामना होता. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुबई येथे 11 चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा चार विकेटने पराभव केला.
ऑस्ट्रेलियातील भारताचा एकदिवसीय रेकॉर्ड ‘भयानक’ आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन भूमीवर 54 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने येथे फक्त 14 सामने जिंकले आहेत आणि 38 सामने गमावले आहेत. दोन सामने अर्निणीत राहिले आहेत. भारताची ऑस्ट्रेलियातील शेवटची एकदिवसीय मालिका नोव्हेंबर 2020 मध्ये होती. जी ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती. त्यावेळी स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.
एक आकडेवारी भारतासाठी थोडी दिलासादायक आहे. खरं तर, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध आठ द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. भारतीय संघ आगामी मालिकेत या विक्रमाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांनी शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका सप्टेंबर 2023 मध्ये खेळली होती. 2023च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारताने तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता पण ऑस्ट्रेलियाने जेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंग केले.
Comments are closed.