मोहम्मद शमीला तोड नाही! वनडेसाठी फिट नाही म्हणणाऱ्या अजित आगरकरला कामगिरीतून दिलं सडेतोड उत्तर
रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमी: टीम इंडियामधील खेळाडूंच्या निवडीवरून वाद होणं ही काही नवी गोष्ट नाही. कधी एखाद्या खेळाडूची दुर्लक्ष केल्याबद्दल चर्चा होते, तर कधी निवडीच्या कारणांवर प्रश्न उपस्थित होतात. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत भारताचे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, ज्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं नाही.
शमीने पुन्हा दाखवली घातक गोलंदाजीची झलक
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शमीला वगळण्यात आल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाच वातावरण आहे. मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी शमीला वगळण्याचं कारण त्याची फिटनेस असल्याचं सांगितलं होतं, मात्र शमीने स्वतः हे दावे फेटाळून लावले. सध्या मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये बंगालकडून खेळत आहेत आणि तेथे त्याने पहिल्याच सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी अजित आगरकर यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
वनडेसाठी फिट नाही म्हणणाऱ्या अजित आगरकरला सडेतोड उत्तर
बंगालकडून खेळताना शमीने पुन्हा एकदा आपल्या घातक गोलंदाजीची झलक दाखवली. पहिल्या डावात त्याने 14.5 षटकांत 37 धावा देत 3 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 24.4 षटकांत फक्त 38 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या. अशा प्रकारे उत्तराखंडविरुद्धच्या या सामन्यात शमीने एकूण 7 विकेट्स घेत आपल्या फॉर्म आणि फिटनेसबद्दल बोलणाऱ्या अजित आगरकर यांना सडेतोड उत्तर दिले.
🚨 रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीसाठी ७ विकेट्स 🚨
14.5-4-37-3 पहिल्या डावात
24.4-7-38-4 दुसऱ्या डावातदेशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मोठी वक्तव्ये करत आहे. 🔥 pic.twitter.com/AslqpT4o0f
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 18 ऑक्टोबर 2025
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, शमी पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. मात्र, शमीने आधीच स्पष्ट केलं होतं की तो पूर्णपणे फिट आहे, आणि आता रणजीतील त्याच्या कामगिरीने त्याने तो सिद्धही करून दाखवलं आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावर चाहते अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यावर टीका करत आहेत. लोकांचा सवाल आहे की, जेव्हा शमी इतके फिट आणि फॉर्ममध्ये आहेत, तेव्हा त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का वगळलं गेलं?
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.