IND vs AUS: ऑस्ट्रेलियातील त्यांचा शेवटचा दौरा? सामन्याच्या एका दिवस आधी मिचेल मार्शचा रोहित-विराटवर मोठा खुलासा

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरूवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. मालिकेचा पहिला सामना 19 ऑक्टोबर, रविवारी, पर्थमधील ऑप्टस स्टेडियममध्ये होईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे तयार आहेत. सामन्यापूर्वी एका दिवसापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स झाली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) यांचा उल्लेख झाला. कारण दीर्घ काळानंतर हे दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानावर परत येत आहेत, त्यामुळे चाहतेही विराट-रोहित यांना खेळताना पाहण्यासाठी खूप उत्सुक होते, आणि ही अपेक्षा आता पूर्ण होणार आहे.

सामन्याच्या एका दिवस आधी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑस्ट्रेलिया कर्णधार मिचेल मार्श (Mitchell marsh) म्हणाला,
माझ्या करिअरमध्ये मला रोहित-विराट यांच्याविरुद्ध खेळण्याच भाग्य लाभलं आहे. हे दोघे खूप मोठे दिग्गज खेळाडू आहेत. विशेषतः विराट हा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये महान रन चेजर आहे. तुम्ही पाहू शकता, तिकीटांची विक्री झाली आहे कारण सगळे त्यांना पाहण्यासाठी येत आहेत.

त्याने पुढे असेही सांगितले,
जर ऑस्ट्रेलियात हा त्यांचा शेवटचा दौरा असेल, तर ते नक्कीच त्याचा आनंद घेतील. मला आशा आहे की लोकांना त्यांचं सर्वोत्तम क्रिकेट पाहायला मिळेल, आणि दोन्ही महान फलंदाजांना ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना पाहता येईल.

Comments are closed.