एका शापामुळे शतकानुशतके दिवाळी आली नाही!

वृत्तसंस्था / सिमला

सोमवारपासून साऱ्पा देशात दीपावलीचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. तथापि, हिमाचल प्रदेशात एक खेडे असे आहे, की जिथे गेल्या अनेक शतकांपासून हा सण साजरा करण्यात आलेला नाही. एका सतीच्या शापामुळे या गावातील लोक दीपोत्सव साजरा करत नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.

सामू असे या गावाचे नाव आहे. अनेक शतकांपूर्वी एक महिला आपल्या पतीच्या मृतदेहासह सती गेली होती. पतीच्या चितेवर जाण्यापूर्वी तिने गावाला शाप दिला होता, तेव्हापासून या गावात दीपावली साजरी करण्याची अनुमती कोणालाही मिळत नाही. केवळ गावकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी घरात दिवे किंवा पणत्या लावण्याची अनुमती दिली जाते. तथापि, गोडधोडाचे खाणे, फटाके वाजविणे किंवा एकमेकांना मिठाई वाटणे, शुभेच्छा देणे, हे दीपोत्सवाच्या काळात सर्वत्र घडणारे कार्यक्रम या गावी केले जात नाहीत. ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न काही जणांनी करुन पाहिला आहे. तथापि, तो यशस्वी झालेला नाही. आजही या गावातील नागरीक आणि स्थानिक प्रशासनही या प्रथेचे कठोरपणे पालन करत आहे.

 

 

Comments are closed.