तीन खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणची माघार; PCB चा मोठा डाव, तिरंगी मालिकेसाठी नव्या संघाची घोषणा


पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध अद्यतन: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही दिसू येत आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा  (3 Cricketers Die In PAK Airstrike) मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून (Tri-Series) माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जाणार होती. त्यात यजमान पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ सहभागी आहेत.

अफगाणिस्तानची माघार, PCB चा मोठा डाव (Afghanistan’s withdrawal tri-series in Pakistan)

अफगाणिस्तानच्या माघारीनंतर केवळ एका दिवसात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नव्या तिसऱ्या संघाची घोषणा केली आहे. आता झिम्बाब्वे (Zimbabwe named replacement in T20I tri-series in Pakistan) हा संघ अफगाणिस्तानच्या जागी या टी-20 तिरंगी मालिकेत खेळणार आहे. ही मालिका 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी दिली. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या कथित हवाई हल्ल्यात आपल्या तीन खेळाडूंचा मृत्यू झाल्याचं सांगत, या मालिकेसाठी संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. रावळपिंडीमध्ये सुरू होणाऱ्या या मालिकेत श्रीलंका हा तिसरा संघ असेल.

झिम्बाब्वेचा सहभाग जाहीर करताना PCB ने सांगितले की, “अफगाणिस्तानने या स्पर्धेत सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली आहे.” पीसीबीच्या निवेदनात म्हटले आहे, “झिम्बाब्वे क्रिकेटने 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे होणाऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय त्रिकोणी मालिकेसाठी आमंत्रण स्वीकारले आहे. या स्पर्धेत श्रीलंका देखील सहभागी होणार आहे.”

ही तिरंगी मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला जाईल. दुसरा सामना 19 नोव्हेंबरला होणार असून त्यात श्रीलंका झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार आहे. रावळपिंडीतील दोन सामन्यांनंतर उर्वरित सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळले जातील. या मालिकेचा अंतिम सामना 29 नोव्हेंबरला लाहोरमध्ये रंगणार आहे.

पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

  • 17 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  • 19 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  • 22 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 23 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 25 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 27 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 29 नोव्हेंबर – अंतिम सामना, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

हे ही वाचा –

Aus vs Ind 1st ODI : 3 वेगवान गोलंदाज, 2 फिरकीपटू तर…. पहिल्या वनडेमध्ये ही असणार टीम इंडियाची प्लेइंग-11, नितीश कुमार रेड्डीचं पदार्पण!

आणखी वाचा

Comments are closed.