ठाकरेंना ‘मामा’ बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले; खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत
नाशिक क्राईम मामा राजवाडे : नाशिकमधील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. भाजपचे (BJP) पदाधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) दाखल झालेल्या नव्या तक्रारीमुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Nashik Crime Mama Rajwade: बार चालकाला धमकी देत हप्त्याची मागणी
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मामा राजवाडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी पंचवटी परिसरातील एका बार चालकाकडून जबरदस्तीने 50 हजार रुपयांचा हप्ता मागितला. त्यासाठी त्यांनी धमकी दिली, विनयभंग केल्याचा तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
Nashik Crime Mama Rajwade: गोळीबार प्रकरणात आधीच कोठडीत
याआधी मामा राजवाडे गंगापूर रोडवरील विसे मळा परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातही गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या घटनेत भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागूल (Ajay Bagul), पप्पू जाधवसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. गंगापूर रोड गोळीबार प्रकरणानंतर मामा राजवाडे यांच्यावर पुन्हा एक गुन्हा झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते.
Nashik Crime: रिक्षा चालकांकडून प्रवाशाला मारहाण
दरम्यान, नाशिकमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशावर रिक्षा चालकांनी लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्रवासी बस स्टँडजवळ उभा असताना, काही बेधुंद अवस्थेतील रिक्षा चालकांनी त्याला मारहाण केली. घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे या घटनेविषयी जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.