कर्णधार बदलला, पण टॉसचं नशिब तसंच; 23 महिन्यांचा अपयशाचा सिलसिला सुरूच
टीम इंडियाने शेवटचा नोव्हेंबर 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यात टॉस जिंकला होता. तेव्हापासून, भारतीय संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकामागून एक टाॅसच्या पराभवांना तोंड द्यावे लागत आहे. कर्णधारही बदलला आहे, टीम इंडियाने 23 महिन्यांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये टॉस जिंकलेला नाही. कर्णधार बदलला आहे, परंतु टीम इंडियाचे नशीब अजूनही बदललेले नाही. भारताने शेवटचा टॉस नोव्हेंबर 2023 मध्ये जिंकला होता, जो वर्ल्ड कप सेमीफायनल होता.
टीम इंडियाने 15 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात टॉस जिंकला होता. त्यावेळी टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा होता. आता, 19 ऑक्टोबर 2025 रोजी, शुबमन गिल भारतीय संघाचा कर्णधार आहे, परंतु टॉस अजूनही भारताच्या बाजूने पडलेला नाही. भारताने त्यानंतर 2023च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासह 16 सामने खेळले आहेत, परंतु भारतीय संघाने टॉस जिंकलेला नाही.
तथापि, चांगली बातमी अशी आहे की भारतीय संघाने या काळात बरेच सामने जिंकले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामनाही याच काळात खेळला गेला. त्यामुळे, टॉस भारतासाठी समस्या नाही. तथापि, पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात टॉस गमावणे टीम इंडियासाठी दु;खद ठरले, कारण दोन माजी आणि विद्यमान भारतीय कर्णधार फक्त 25 धावांवर बाद झाले. रोहित शर्मानंतर, विराट कोहली आणि नंतर शुबमन गिल झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. भारत या खराब सुरुवातीचा शेवट कसे करेल? हे पाहणे मनोरंजक असेल.
Comments are closed.