भारताने 136 धावा केल्या, तरी ऑस्ट्रेलियाला 131 धावांचं टार्गेट का? जाणून घ्या सविस्तर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला वनडे सामना पर्थच्या मैदानावर खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 26 षटकांचा करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 गडी गमावून फक्त 136 धावा केल्या.

पावसामुळे खेळ अनेक वेळा थांबवावा लागला, ज्याचा परिणाम भारतीय फलंदाजांच्या खेळात स्पष्टपणे दिसून आला. भारताने 136 धावा केल्या असल्या तरी ऑस्ट्रेलियासमोर फक्त 131 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 137 धावांचे असायला हवे होते, तर हे 6 धावे कमी कशा झाल्या? हे समजून घेऊया.

पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. सुरुवातीला सामना 35 षटकांचा करण्यात आला, पण पुन्हा पाऊस आल्याने तो 32 षटकांचा झाला. अखेरीस सामना कमी करून 26 षटकांचा करावा लागला. षटके कमी झाल्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार डीएलएस पद्धतीने ऑस्ट्रेलियाला लक्ष्य पुनःगणना करून देण्यात आले आहे.

या पद्धतीचा उपयोग पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लक्ष्य ठरवण्यासाठी केला जातो. लक्ष्य निश्चित करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो, जसे की पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने किती गडी गमावले, त्यांची एकूण धावसंख्या किती होती, आणि किती षटके खेळली गेली. या सर्व बाबी लक्षात घेऊन अंतिम लक्ष्य ठरवले जाते.

सात महिन्यांनंतर भारतीय संघाच्या जर्सीत परतलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्या वनडे सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले. हिटमॅनने 14 चेंडूंचा सामना केला, पण केवळ 8 धावा करू शकला. संपूर्ण डावात रोहितच्या बॅटमधून फक्त एकच चौकार निघाला. तर विराट कोहली आपले खातेही उघडू शकला नाही. आठ चेंडू खेळल्यानंतर तो मिचेल स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यर आणि कर्णधार शुबमन गिलही फलंदाजीत काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत.

Comments are closed.