14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वयावर दिग्गजांनी केले प्रश्न उपस्थित! रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan royals) 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आयपीएल 2025 (IPL2025) मध्ये पदार्पण केले आणि तुफानी फलंदाजी करून आपले नाव मोठ्या दिग्गजांत नोंदवले. इतक्या कमी वयातच त्याने केलेल्या आक्रमक खेळीने सर्वांनाच खूप प्रभावित केले आहे. मात्र पदार्पणानंतर पासूनच सूर्यवंशीच्या वयावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज खेळाडूनेही त्याच्या वयावर शंका उपस्थित केली होती. याबाबत आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठा खुलासा केला आहे.

ऑस्ट्रेलियातील लिस्टएनआर स्पोर्ट पॉडकास्टवरील विलो टॉक शोमध्ये वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना रवी शास्त्रींनी आयपीएल 2025 मधील एक किस्सा सांगितला. शास्त्री म्हणाले, मी जयपूरमध्ये त्या सामन्यात ऑन-एअर होतो. चौथ्या षटकात मी कॉमेंट्री सुरू केली आणि सलग दोन वेळा कॉमेंट्री केली. त्यावेळी आमच्याकडे एक कॉमेंटेटर कमी होता, त्यामुळे मला सलग बोलावे लागले. माझ्यासोबत तिथे मॅथ्यू हेडन (Matthew Headan) होता. तो वैभवची फलंदाजी पाहून थक्क झाला आणि म्हणाला, हा मुलगा 14 वर्षांचा असूच शकत नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं,कॉम डाउन, म्हणजे शांत हो.

रवि शास्त्री पुढे म्हणाले की, वैभव सूर्यवंशीचं बॅटिंग सेन्स, त्याची टायमिंग आणि शॉट सिलेक्शन हे खरंच कमाल आहे. एवढ्या लहान वयात अशी प्रगल्भता क्वचितच दिसते. त्याच्या खेळात आत्मविश्वास झळकतो, पण त्याचबरोबर संयमही आहे. म्हणूनच अनेकांना त्याच्या वयाबद्दल शंका येणं स्वाभाविक आहे. मात्र मला वाटतं, पुढील काही वर्षांत वैभव भारतीय क्रिकेटचं एक मोठं नाव होणार यात शंका नाही.

Comments are closed.