परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा आई-बाबा झाले, इन्स्टावर पोस्ट करत दिली गूडन्यूज

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा  आई-बाबा झाले. दोघांनी इंस्टाग्रावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहते आणि मित्रपरिवाराला ही गोड बातमी दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आई बनली आहे. रविवारी 19 ऑक्टोबर रोजी तिने गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी परिणितीचा नवरा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे.

राघव चड्डा यांनी लिहीले की, अखेर आमच्या बाळाचे आगमन झाले आहे. आता आम्हाला याआधी आमचे आय़ुष्य कसे होते ते आठवतही नाही. आमचे हृदय प्रेमाने भरुन गेले आहे. याआधी आमच्याकडे एकमेकांची सोबत होते आता आमच्याकडे सर्वकाही आहे. परिणीती -राघव

Comments are closed.