मिचेल स्टार्कने मोडला का शोएब अख्तर यांचा विक्रम? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मिचेल स्टार्कने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेच्या पहिल्याच चेंडूवर जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने सामना सुरू होताच पहिला ओव्हर टाकला आणि पहिलाच चेंडू रोहित शर्माकडे टाकला. त्या चेंडूचा वेग पाहून सगळेच थक्क झाले. कारण स्पीडोमीटरवर तो वेग 176.5 किमी प्रति तास असा दिसला, जो शोएब अख्तरच्या जागतिक विक्रमापेक्षाही जास्त आहे.

सर्वात जलद वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्या नावावर आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाणारे अख्तर यांनी 2003 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा फलंदाज निक नाईट याला 161.3 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासातील तोच सर्वात जलद चेंडू मानला जातो. मात्र, मिचेल स्टार्कने रोहित शर्माला टाकलेला चेंडू 176.5 किमी प्रति तास वेगाचा दाखवला गेला.

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मिचेल स्टार्कने रोहित शर्माला 176.5 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला, जो शोएब अख्तरच्या वर्ल्ड रेकॉर्ड पेक्षाही अधिक आहे. पण मिचेल स्टार्कने वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे का? याचे उत्तर आहे, नाही, कारण ही एक तांत्रिक चूक होता.

Comments are closed.