IND vs AUS: रोहित-विराट की कर्णधार गिल, टीम इंडियाच्या पराभवाला नेमकं जबाबदार कोण? जाणून घ्या सविस्तर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज, रविवारी 19 ऑक्टोबरला, 3 वनडे सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियममध्ये झाला. पावसामुळे बाधित झालेला हा सामना DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाने 7 विकेटने जिंकला. या पराभवानंतर प्रश्न उभा राहिला की, भारताच्या पराभवाला जबाबदार कोण?

पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला भयंकर पराभव पत्करावा लागला. या पराभवा मागे कोणत्याही एका व्यक्तीचा दोष नाही, तर सर्व भारतीय फलंदाज फ्लॉप झाले आणि त्यामुळे टीम मोठा स्कोर तयार करण्यात अपयशी ठरली. DLS पद्धतीनुसार भारताने फक्त 26 षटकांमध्ये 9 विकेट गमावून 136 धावा केल्या . भारताच्या स्कोअरकार्डकडे नजर टाकली तर विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि कर्णधार शुबमन गिल या 4 खेळाडूंना या पराभवाचे मुख्य कारण मानता येईल. या 4 ही खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण पहिल्या वनडेमध्ये त्यांनी त्यानुसार कामगिरी केली नाही.

भारतीय टीमचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार रोहित शर्मा जवळजवळ 222 दिवसांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मैदानावर उतरले, पण त्याने समाधानकारक कामगिरी केली नाही. विराट 8 चेंडूत शून्यावर मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला, तर रोहित 14 चेंडूत 8 धावा बनवून हेजलवुडच्या चेंडूवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियात विराट आणि रोहितचा अनुभव चांगला आहे, त्यामुळे त्यांच्यावर जास्त जबाबदारी होती, पण या सामन्यात ते अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकले नाहीत.

रोहित आणि विराट लवकर आऊट झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी शुबमन गिलवर होती, पण कर्णधार म्हणून गिलही सामन्यात फ्लॉप ठरला. या तीनही स्टार फलंदाजांच्या बाद झाल्यानंतर चाहत्यांची नजर उप कर्णधार श्रेयस अय्यरवर (Shreyas iyer) होती, आणि अशी अपेक्षा होती की तो एका टोकावर टिकून फलंदाजी करेल, पण अय्यरही आपल्या कमजोरीमुळे बाद झाला. विराटने स्टार्कच्या ऑफ साइड चेंडूवर कॅच दिला, तर अय्यर हेजलवुडच्या बाउंसरचा बळी ठरला. त्यामुळे असे म्हणता येईल की, भारताचा हा पराभव या चारही स्टार फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे झाला आहे.

Comments are closed.