IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या पराभवानंतर गौतम गंभीर नाराज? जाणून घ्या सविस्तर!
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला 7 विकेट्सने हरवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, (Head Coach Gautam Gambhir) कर्णधार शुबमन गिलसोबत (Shubman gill) दिसत होते. यावेळी मोर्नी मोर्कलही (Morne Morkel) उपस्थित होते. तीनही जण सामन्यानंतर लगेचच चर्चा करत होते.
गौतम गंभीर या वेळी उदास दिसत होते आणि त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात दिसून येत आहे, की गंभीर पराभवावर विचार करत आहेत.
सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 26 षटकात 136 धावा केल्या. त्याच्या उत्तरात ऑस्ट्रेलियाने 21.1 षटकांत 131 धावांवर लक्ष्य पूर्ण केले. पावसामुळे हा सामना 26 षटकांचा खेळला गेला.
Comments are closed.