मेस्सीची एमएलएसमध्ये दुसरी हॅटट्रिक!

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने मेजर लीग सॉकर (एमएलएस) स्पर्धेत पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत कारकीर्दीतील दुसरी हॅटट्रिक साजरी केली. त्याच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर इंटर मियामी क्लबने नॅशविल एससीचा 5-2 गोल फरकाने पराभव करत दमदार विजय मिळवला. मेस्सीने यंदाच्या एमएलएस हंगामात आतापर्यंत 29 गोल केले असून तो या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलाय. मेस्सीने यापूर्वी न्यू इंग्लंड रेवोल्यूशनविरुद्धच्या 6-2 गोलफरकाच्या विजयात हॅटट्रिक नोंदवली होती. आजच्या सामन्यात मेस्सीने 35 व्या मिनिटाला गोल करत इंटर मियामीला आघाडी मिळवून दिली. तथापि, नॅशविलकडून सॅमने 43 व्या मिनिटाला गोल करत सामना 1-1 अशी बरोबरीत आणला. त्यानंतर मेस्सीने आपल्या क्लासिक खेळाचे प्रदर्शन करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह इंटर मियामीने आपला विजयरथ कायम ठेवला असून, मेस्सीने आपली जादू अजूनही तितकीच प्रभावी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलेय. इंटर मियामीचा बचावपटू इयान फ्रे म्हणाला, ‘मेस्सी प्रत्येक सामन्यात आमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावत आहे, हे सर्वांना स्पष्ट दिसते. त्याच्या प्रतिभेचे वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात.’

Comments are closed.