जेईई मेन 2026 चे वेळापत्रक जाहीर

पहिला टप्पा – 21 जाने. ते 30 जाने., दुसरा टप्पा – 1 एप्रिल ते 10 एप्रिल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) रविवार, 19 ऑक्टोबर रोजी जेईई मेन 2026 चे वेळापत्रक जाहीर केले. अधिसूचनेनुसार, जेईई मेन परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. पहिला टप्पा 21 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित केला जाईल. तर दुसरा टप्पा 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2025 मध्येच अर्जप्रक्रिया सुरू होईल. उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करू शकतील. दुसऱ्या टप्प्याठी अर्ज करण्याची प्रक्रिया जानेवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. यावर्षी उमेदवारांची संख्या वाढण्याची अपेक्षा असल्यामुळे उमेदवारांच्या सोयीसाठी शहरांमध्ये परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली जाणार असल्याचे एनटीएने जाहीर केले आहे.

Comments are closed.