इंग्लंडने टीम इंडिच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला; थेट सेमीफायनलमध्ये मारली एन्ट्री
भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला 20 वा सामना: महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मधील 20वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 बाद 288 धावा केल्या. विजयासाठी भारतासमोर 289 धावांचे आव्हान होते. मात्र, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हे लक्ष्य गाठू शकली नाही आणि अवघ्या 4 धावांनी (England Women won by 4 runs) पराभव स्वीकारावा लागला. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी जबरदस्त खेळी करूनही भारताला विजय मिळवता आला नाही. हा या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
इंग्लंडने भारताचा सलग तिसरा पराभव करून संघात प्रवेश केला #CWC25 उपांत्य फेरी 💪
मध्ये घडल्याप्रमाणे #शोध 👉 https://t.co/rjpR1G7FOE pic.twitter.com/focTb9jAUQ
— ICC (@ICC) 19 ऑक्टोबर 2025
इंग्लंडने सेमीफायनलमध्ये, हीथर नाईटनं ठोकले शतक
पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँट आणि एमी जोन्स यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडसाठी हीथर नाईटने (Heather Knight) 91 चेंडूत 109 धावांची झळाळती शतकी खेळी केली, ज्यात 15 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. एमी जोन्सने 56, कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंटने 38, तर सलामी फलंदाज टॅमी ब्यूमाँटने 22 धावा केल्या. चार्लोट डीन 19 धावांवर नाबाद राहिली. सोफिया डंकली (15), एम्मा लॅम्ब (11) आणि सोफी एक्लेस्टोन (3) या लवकर बाद झाल्या. भारतासाठी दीप्ती शर्माने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर श्री चरणीने 2 गडी बाद केले.
स्मृती आणि हरमनप्रीतची कामगिरी व्यर्थ
289 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. प्रतिका रावल 14 चेंडूत फक्त 6 धावा करून बाद झाली. त्यानंतर हरलीन देओलने 31 चेंडूत 24 धावा करत थोडा स्थैर्य आणला. मात्र खरी झळाळी दिसली ती स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या 125 धावांच्या भागीदारीतून. या जोडीने भारतीय विजयाची आशा निर्माण केली होती. पण मानधना बाद झाल्यानंतर संघाचा डाव पुन्हा कोसळला. दीप्ती शर्माने 57 चेंडूत अर्धशतकी (50 धावा) खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिला दुसऱ्या टोकावरून साथ मिळाली नाही. अखेर भारताला अवघ्या 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतासाठी स्मृती मंधाना 94 चेंडूत 88, हरमनप्रीत कौर 70 चेंडूत 70, आणि दीप्ती शर्मा 57 चेंडूत 50 धावा केल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.