जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं : धनंजय मुंडे


धनंजय मुंडे परळी : आता मला माजी मंत्री म्हणतात, मला लय मोठं वाटतं. मला लय प्रसिद्धी मिळाली. काहीजण एखाद्याचं वाईट करायला बघतात, केला प्रयत्न, एव्हढे दिवस संकट सहन केलं, पण या वाईट करणाऱ्यांना लक्षात आलं नाही शेवटी नियतीला काय मान्य असतं. आपले जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते. जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं, मंत्री नसतांना असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जनतेचे आभार मानले आहे. परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Dhananjay Munde: आगामी निवडणूकीतही मुंडे बहिण- भाऊ एकत्र ये

दरम्यान, राज्यभरात आता नगरपालिका,जिल्हापरिषद निवडणुकांचे वेध लागले आहे. अशातच आगामी निवडणूकीतही मुंडे बहिण- भाऊ एकत्र येणार असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, जिल्हापरिषद निवडणूक असो, आपण हलक्यात घेत नाही. माझी आणि ताईंची (Pankaja Munde)  आता महायुतीचे सरकार आहे. याबाबत एकदा चर्चा झालेली आहे, मला खात्री आहे, विश्वास आहे, या निवडणूकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस युती करुन निवडणूक लढेल, याचा मला विश्वास आहे. आणखी पूर्ण चर्चा होणे बाकी आहे.

Pankaja Munde & Dhananjay Munde: माझी आणि ताईंची आता महायुती सरकार

त्यामुळे आपण तसे निश्चित रहा, जे जे इच्छुक आहेत ते असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आगामी नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूकात युतीचे संकेत दिले आहेत. परळी तालुक्यात आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुंडे बहिण-भाऊ हे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकीत एकत्र दिसले होते, आता नगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीतही एकत्र आल्यास विरोधकांना कडवी झुंज द्यावी लगणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.