जेएनयूमध्ये निदर्शने; 28 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) शनिवारी संध्याकाळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गट आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात हिंसक वळण लागले. डाव्या विचारसरणीच्या समर्थित जेएनयू विद्यार्थी संघटनेने निदर्शने करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) सदस्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची मागणी केली होती. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांनी अभाविप सदस्यांवर हल्ला केल्याचा आणि त्यांना ओलीस ठेवल्याचा आरोप केला आहे. यावेळी दोन्ही गटांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान पोलिसांनी 28 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्याकडे निघालेल्या निषेध मोर्चादरम्यान झालेल्या हाणामारीत सहा पोलीसही जखमी झाले आहेत.

Comments are closed.