दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लेखोराविरुद्ध आरोपपत्र दाखल

30 ऑक्टोबरला होणार सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात सुमारे 400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी सकारिया राजेशभाई खिमजीभाई (41) आणि त्याचा मित्र सय्यद तहसीन रझा यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत विविध गुह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न, हल्ला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप हल्लेखोरावर ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी 30 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8:15 वाजता त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आयोजित जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान हल्ला करण्यात आला होता.

Comments are closed.