Diwali : दिवाळी पार्टीसाठी पुरुषांनी व्हावे असे तयार, दिसाल क्लासी

दिवाळीत हमखास छोटी का होईना दिवाळी पार्टी केली जाते. पार्टी कोणीतीही असो प्रत्येकाला हटके दिसायचे असते. या पार्टीत सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा लूक. लूकमध्ये चेहऱ्याच्या मेकअपपासून ते तुमच्या आउटफिटपर्यत सर्वाचा समावेश होतो. पार्टीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या स्किनकेअर रूटीनबाबत किंवा आऊटफिटबाबत महिलांना कायमच टिप्स देण्यात येतात. पण, आज आम्ही खास पुरूषांनी दिवाळी पार्टीसाठी कसे तयार व्हावे याच्या टिप्स देणार आहोत.

1 – पुरूषांनाही महिलांप्रमाणे त्वचेची काळजी घ्यायला हवी. सुर्यप्रकाशात वावरणे आणि प्रदुषणामुळे पुरूषानांही मृत त्वचा, टॅनिंग यासारख्या तक्रारी जाणवतात. पण, अनेकदा यामागे चेहरा स्वच्छ न करणे कारण असू शकते.

2 – पार्टीआधी तुम्ही दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायला हवा.

3 – चेहऱ्यावरील साचलेली घाण आणि छिद्र स्वच्छ करण्यासाठी एक्सोफोलिएशन करायला हवे.

4 – त्वचेला एक्सफोलिएट केल्यानंतर त्वचेतील छिद्र उघडतात. यासाठी केळी आणि मुलतानी मातीचा पॅक तयार करून वापरू शकता.

5 – पॅक काढल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर क्रीम लावा. फक्त एक लक्षात घ्या, मॉइश्चरायझ करताना मसाज चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.

पुढील आउटफिट ट्राय करता येतील.

सिल्क कुर्ता – दिवाळी पार्टीसाठी सिल्कचा चुणीदार आणि कुर्ता ट्राय करू शकता.

सिल्क ब्लॅब्स ब्रोक कावळे पुरुष Payjm – सिल्क ब्लेंड कुर्ता पायजमा फक्त दिवाळीच नाही तर कोणत्याही सणावाराला तुम्ही घालू शकता.

नेहरू जॅकेट – तुम्हाला नेहरू जॅकेट आवडत असतील तर तुम्ही ते ट्राय करू शकता.

कुर्ता-धोती पॅट – कोणत्याही सिल्क कुर्त्यासोबत तुम्ही कुर्ता धोती पॅट ट्राय करू शकता.

हेही वाचा –

Comments are closed.