भाजपच्या मिशन लोटसनंतर राष्ट्रवादी सतर्क! मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात, आढावा घेणार
सोलापूर : सोलापुरात भाजपच्या मिशन लोटसनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील अॅक्शन मोडवरआला आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे सोलापुरातील तीन माजी आमदार भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) उद्या सोलापुरात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे पक्षांतरानंतर आणि आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकाबाबतीत दत्तात्रय भरणे आढावा घेणार आहेत.
राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपच्या गळाला?
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणाऱ्याची शक्यता आहे. कारण तीन आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.मात्र, या जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावण्यासाटी भाजपने प्रयत्न सुरु केल्याचे चित्र दिसत आहेत. राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. या पार्श्वभूमीर राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाचं राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता माजी आमदार संजय शिंदे यांच्या माढा तालुक्यातील फार्महाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर दुपारी साडेतीन वाजता सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे हे तीन माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे सोलापूरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. भरणे यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ऑपरेशन लोटस सुरू असून सोलापूर जिल्ह्यात दिवाळीचे अजून फटाके फुटतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही एक मोठी खेळी मानली जात आहे. त्यात, आता दीपक साळूंखे पाटील यांचेही नाव जोडले जात आहे. साळुंखे पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेचीनिवडणूक लढवली होता.
महत्वाच्या बातम्या:
माझं खरं आडनाव गुंड आहे, हे त्याने विसरू नये; भाजपात जाणाऱ्या राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यास थेट इशारा
आणखी वाचा
Comments are closed.