राज्यात भाजपमध्ये ‘मेगा भरती’ सुरु असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोठा धक्का; नाशिकमधील गायकवाडांच्या
संगीता गायकवाड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राज्यात भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) जोरदार प्रवेश सोहळे सुरू असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) भाजपला नाशिकमध्ये (Nashik) एक मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangeeta Gaikwad) आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड (Hemant Gaikwad) यांनी भाजपचा राजीनामा देऊन आज (सोमवार दि. 20) ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ठाकरे पक्षात प्रवेश केला.
या सोहळ्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आदी नेते देखील उपस्थित होते. मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली, ज्यातून गायकवाड दाम्पत्याचा पक्षप्रवेश हा एक मोठा राजकीय संदेश देणारा ठरला.
Who is Sangeeta Gaikwad: संगीता गायकवाड कोण आहेत?
संगीता गायकवाड या नाशिकमधील प्रभाग क्रमांक 20 येथील माजी नगरसेविका असून, भाजपमध्ये सक्रिय होत्या. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला नाशिकमध्ये धक्का बसला असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
Nashik NMC Election: महापालिका निवडणुकीत रंगणार लक्षवेधी लढत
नाशिक महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नाशिकरोडमधील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्याविरोधात हेमंत गायकवाड हे शिवसेनेच्या (उद्धव गट) तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही लढत नाशिकरोडमध्ये लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Uddhav Thackeray: नाशिकमध्ये मी पुन्हा येईन : उद्धव ठाकरे
या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आज नरक चतुर्दशी आहे, कृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर कोण वेगळं सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. आता हा प्रवाह सुरु झाला आहे. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसं, अमराठीही एकत्र आले आहेत. कारण कुणालाच हे आवडलेले नाही. संगीता गायकवाड आणि इतर सगळे शिवसेनेत आले मी सगळ्यांच्या देखत तुम्हाला विचारतो तुम्हाला काही खोके वगैरे मिळाले आहेत का? काही धाक दाखवला गेला का? कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं नेभळट असतात. यापेक्षा निष्ठावान सैनिक मला प्रिय आहेत. मी भाजपाच्या सगळ्याच नेत्यांना विनंती करतो आहे आपण कसं विष पोसत आहात याकडे डोळे उघडून बघा. इतिहासात पापाचे धनी म्हणून स्वतःची नोंद होऊ देऊ नका. मी नाशिकमध्ये तसा आधीही येऊन गेलो आहे. पण नाशिकमध्ये मी पुन्हा येईन. त्यावेळी भगवा फडकलेला असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.