ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


बंगळुरु : बंगळुरु पोलिसांनी ओलाचे संस्थापक आणि सीईओ (OLA CEO) भाविश अग्रवाल (Bhavish Aggrawal) आणि वरिष्ठ कार्यकारी सुब्रत कुमार दास यांच्या विरुद्ध आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.  ओलाच्या एका कर्मचाऱ्यानं कथितपणे सप्टेंबर महिन्यात कामाच्या दबावामुळं जीवन संपवलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार 38 वर्षांच्या के. अरविंद या व्यक्तीं 28 पानांची नोट जीवन संपवण्यापूर्वी लिहिली होती. त्यामध्ये त्यानं त्याच्या वरिष्ठांवर कामाच्या ठिकाणी शोषणाचा आरोप केला होता. पोलिसांनी म्हटलं की के. अरविंद याच्या भावाच्या तक्रारीवरुन हा एफआयआर नोंदवण्यात आला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एफआयआरमध्ये भाविश अग्रवाल, सुब्रत कुमार दास जे ओलामध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत, त्यांच्यासह इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार एफआयआर नोंदवण्यात आला. तक्रारीत अरविंदच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या जवळपास 17.46 लाख रुपयांच्या कथित अनियमिततांचा देखील उल्लेक आहे.

के. अरविंद यानं कथितपणे त्याच्या घरी असताना विष प्यायलं होतं, ही घटना 28 सप्टेंबरला घडली होती. त्यानंतर त्याला एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा जीव वाचला नव्हता. त्यानंतर कुटुंबाला एक नोट आढळली होती. ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी सतत होणारं शोषण आणि ओलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता.

के. अरविंद यांच्या कुटुंबानं आरोप केला की कंपनीचा एचआर विभाग अरविंदच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण देण्यात अयशस्वी ठरला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एफआयआरमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी या बाबतची चौकशी सुरु अशल्याची माहिती दिली.

ओलाकडून या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान गेल्या महिन्यात जपनाची दिग्गज कंपनी सॉफ्टबँकद्वारे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीतून त्यांची भागीदारी कमी करण्यात आली होती. त्यानंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर घसरले आहेत.

5 सप्टेंबरला सेबीकडे केलेल्या फायलिंगनुसार सॉफ्टबँकची गुंतवणूक शाखा एसव्हीएफ II ऑस्ट्रिच एलएलसीनं 15 जुलै 2 सप्टेंबर दरम्यान ओला इलेक्ट्रिकचे 94.9 दशलक्ष शेअरची विक्री केली आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर 2.14 रुपयांनी घसरुन 54.94 रुपयांवर आला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.