इंग्लंडविरुद्धच्या पराभवाला मीच जबाबदार! चांगला शॉट खेळता आला असता; स्मृतीची कबुली

महिला विश्वचषकात हिंदुस्थानी संघाचा तिसरा पराभव झाल्याने स्पर्धेतील पुढील प्रवास आणखीच खडतर बनला आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या पाठोपाठ इंग्लंडने यजमान हिंदुस्थानला पराभवाची धूळ चारली आणि हिंदुस्थानी संघ चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. अशातच उपकर्णधार स्मृती मानधनाने चुकीची कबुली देताना पराभवाची जबाबदारी स्वीकारली. स्मृती बाद होताच हिंदुस्थानची गाडी रुळावरून घसरली. हाच धागा पकडत तिने आपण खेळलेल्या चुकीच्या शॉटबद्दल बोलताना चूक मान्य केली आणि इंग्लंडविरुद्धच्या पराभवास स्वतःला जबाबदार ठरवले.

सामन्यानंतर मानधना म्हणाली, मला वाटते की मला आणखी चांगला शॉट खेळता आला असता. 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आमची काहीशी चांगली सुरुवात झाली होती. मात्र, तरीदेखील पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, स्मृतीने 88 धावांची लक्षणीय खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत काwरसोबत 125 आणि दीप्ती शर्मासोबत 67 धावांची महत्त्वाची भागी केली. मात्र, एका चुकीमुळे स्मृतीला बाहेरचा रस्ता धरावा लागला.

यजमानांची डोकेदुखी राखले

आपल्या घरच्या मैदानावरही हिंदुस्थानी संघाला संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. सांघिक खेळीचा अभाव पराभवास कारणीभूत असला तरी कर्णधार हरमनप्रीत काwरचे अनपेक्षित निर्णय टीकाकारांना आमंत्रण देत आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानला नेहमीच वरचढ ठरला आहे. ती परंपरा यंदाच्या विश्वचषकातही कायम राहिली आणि हिंदुस्थानला 330 धावांचा बचाव करता आला नाही. त्यानंतर आफ्रिका आणि इंग्लंडने यजमानांच्या जखमेवर मीठ चोळले.

Comments are closed.