शिवसेनेची आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी

शिवसेनेने जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेतील आरे कॉलनी परिसरात आदिवासी कुटुंबांसोबत अनोखी दिवाळी साजरी केली. शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांच्या नेतृत्वाखाली आरे कॉलनीतील 27 आदिवासी पाडय़ांतील जवळपास 1100 कुटुंबांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू आणि फराळाचे वाटप करण्यात आले. सामान्य कुटुंबांनाही दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी शिवसेनेने ही परंपरा जपली आहे. भेटवस्तू आणि फराळ वाटप कार्यक्रमप्रसंगी शिवसेना विधानसभाप्रमुख विश्वनाथ सावंत, उपविभागप्रमुख जितेंद्र वाळवी, बाळा साटम, जयवंत लाड, महिला उपविभाग संघटक मयूरी रेवाळे, महिला शाखा संघटक हर्षदा गावडे, युवासैनिक अजय प्रधान, वैभव कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.