जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारास स्थगिती, पुण्यातील भाजपचा ‘जाग्या’मोहोळ

पुण्यातील जैन बार्ंडग जमीन विक्रीशी भाजप खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा संबंध जोडला जात आहे. पुण्यातील जागा गिळणारे ‘जाग्या मोहोळ’ अशी टीका त्यांच्यावर होत असून जमीन विक्रीच्या विरोधात जनआंदोलन उभे राहिले आहे. आज मुंबईतील धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराला स्थगिती दिली आहे.
राजकीय दबावातून पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी नियम व कायद्यांचे उल्लंघन करून या जागा विक्रीला मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे. यावर सुनावणी झाली असता धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या जमीन विक्री व्यवहाराला स्थगिती दिली. 28 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी पुराव्यांसहित युक्तिवाद करत भक्कम बाजू मांडली. आयुक्तांनी त्यावर ‘स्टेटस्को’ म्हणजे स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला. जैन बार्ंडगच्या जागेमध्ये जैन मंदिर आहे का? ते मंदिर कोणाचे आहे? त्याचे कामकाज कोण बघते? त्याची एकूण जागा किती? आणि जर तिथे पुनर्विकास करायचा असेल तर ते मंदिर तोडण्याची गरज पडेल का? याबाबत 27 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्तांनी पुणे सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
Comments are closed.