28 पानी चिठ्ठी लिहित OLA च्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, सीईओंवर खळबळजनक आरोप; FIR दाखल, नेमकं क


OLA: देशातील आघाडीच्या स्टार्टअप्सपैकी एक असलेल्या ओला (OLA) इलेक्ट्रिक कंपनीतील 38 वर्षीय अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कर्मचाऱ्याने लिहिलेल्या 28 पानी सुसाइड नोटमध्ये कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल (OLA CEO Bhavish Aggrawal) यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळ, पगार नाकारणे, आणि सततच्या दबावामुळे आयुष्य उध्वस्त झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मृत अभियंत्याचे नाव अरविंद (पूर्ण नाव गोपनीय) असून ते ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलॉगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. 2022 पासून कंपनीत नोकरी करत असलेल्या अरविंद यांनी 28 सप्टेंबर रोजी बंगळुरूतील चिक्कलसंद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. विष घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

OLA: सुसाइड नोटमधील गंभीर आरोप

अरविंद यांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना एक 28 पानी सुसाइड नोट आढळून आली. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी ओला इलेक्ट्रिकमधील कामाच्या तणावाचे, वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचे आणि वेतन थकवण्याच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन केले आहे. विशेषतः कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांच्यासह सुब्रत कुमार दास आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद करून, त्यांनीच मानसिक छळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

OLA: मृत्यूनंतर खात्यात जमा झाले 17.46 लाख

अरविंद यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांच्या बँक खात्यात 17,46,31 इतकी मोठी रक्कम जमा करण्यात आली. या व्यवहाराबाबत त्यांच्या भावाने कंपनीकडे विचारणा केली असता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने अरविंदच्या भावाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

OLA CEO Bhavish Aggrawal: CEO सह इतरांविरोधात गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी ओला इलेक्ट्रिकचे CEO भाविश अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास, आणि इतर संबंधितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

OLA : कंपनीची प्रतिक्रिया

या घटनेनंतर ओला इलेक्ट्रिकने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात कंपनीने म्हटले आहे की, “आमचे कर्मचारी अरविंद यांच्या आकस्मिक मृत्यूने आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. अरविंद मागील साडे तीन वर्षांपासून आमच्यासोबत कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीही कोणतीही औपचारिक तक्रार केली नव्हती. तरीही या प्रकरणात आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, ” असे, म्हटले आहे. तसेच, मात्र कंपनीचे मालक आणि इतर अधिकाऱ्यांवर झालेल्या FIR ला आम्ही कर्नाटक हायकोर्टात आव्हान देऊ असं कंपनीने म्हटलं आहे.

आणखी वाचा

Vashi Fire news: बिछान्याला खिळलेल्या आजीबाईंना उठताच आलं नाही, खोलीतील धुराने श्वास गुदमरला अन्… वाशीतील अग्नितांडवात चौघांचा मृत्यू

आणखी वाचा

Comments are closed.