24 तासांत जळगावात 2500 रुपयांनी सोनं महागल, लक्ष्मीपूजनादिवशी ग्राहक संभ्रमात, 10 ग्रॅमसाठी कित


जळगाव सोन्याचे आजचे दर लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचे आणि चांदीचे खरेदीचे वातावरण उत्साही पाहायला मिळत आहे. शहरातील विविध ज्वेलर्सकडे ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.लोकांच्या खरेदीच्या उत्साहात लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोन्याची शिकले व दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल दिसतोय. (Gold Rates Today)

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचे भाव गेल्या 24 तासांतच जीएसटी सह 2,500 रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर 1 लाख 34,400 रु. प्रति 10 ग्रॅमवर असून, चांदीचे भाव 1,74,000 रु. प्रति किलोवर पोहोचले आहेत. या वाढीमुळे ग्राहकांच्या खरेदी बजेटवर परिणाम झाला असून अनेकांनी अपेक्षित खरेदी थांबवली किंवा कमी प्रमाणात खरेदी केली.

जळगावच्या सुवर्णनगरीत सोने खरेदीचा कल कसा?

व्यवसायिकांनी सांगितले की, अमेरिकेच्या टेरिफ रेट धोरणामुळे आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. “आगामी काळात सोन्याचे भाव दीड लाखांवर जाण्याची शक्यता आहे,” असे सांगण्यात येत आहे.

सोन्याच्या खरेदीसाठी बाजारात नेहमीसारखी गर्दी नसली तरी ज्वेलर्सकडे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनच्या उत्सवाला अनुकूल ऑफर देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित केले करण्यासाठी विविध डिझाइन आणि आकारात दागिने, सोन्याचे शिकले व लक्ष्मी मूर्ती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सोन्याची खरेदी करणारा ग्राहक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, भाववाढीमुळे बाजारपेठेत सतत हलचाल सुरू आहे. व्यापार्‍यांनी भाववाढ लक्षात घेऊन ग्राहकांसाठी सवलती व थोडक्यात आर्थिक सल्ला देत उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन दिले केले आहे.

सोने आणि चांदीचे दर वाढणार

तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा एका तोळ्याचा दर 1 लाख 60 हजार रु. असेल. तर, 2025 मध्ये सोन्यानं 70 टक्के परतावा दिला आहे. ब्रिटनची बँक SSBC च्या अंदाजानुसार 2026 मध्ये सोन्याचे दर 5000 डॉलर प्रति औंसवर जाण्याची शक्यता आहे. या हिशोबानं भारतात सोन्याचे एका तोळ्याचे दर 1 लाख 50 हजार रु. असतील. सोन्याच्या दरानं 5000 डॉलरचा टप्पा पार झाल्यास दर 1 लाख 60 हजारांवर पोहोचू शकतो. सध्या सोन्याचा दर 4500 डॉलर प्रति औंसवर आहे. बँक ऑफ अमेरिकेनं देखील सोन्यासाठी टारगेट प्राइस वाढवून 5000 डॉलर केलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.