Diwali Padwa : यंदाचा पाडवा करा खास, जोडीने व्हा तयार

दिवाळी पाडवा म्हणजे नवरा-बायकोच्या नात्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. पाडव्याला पत्नी पतीस अभ्यंगस्नान घालते आणि त्याचे औक्षण करते. पतीला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते. नवरा आपल्या घरातील लक्ष्मीला आजच्या दिवशी भेटवस्तू देतो. यंदाचा पाडवा स्पेशल होण्यासाठी तुम्ही एकत्र तयार छान तयार होऊ शकता. यामुळे तुमचा लूक खूप छान दिसेल.  दिवाळी पाडव्याला नवरा-बायको फॅशनसाठी खास कपड्यांची निवड करू शकतात. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा मिलाफ साधता येईल. पाहूयात यांसदर्भातील काही टिप्स

पारंपारिक देखावा –

तुम्हाला पारंपरिक लूक करायचा असेल तर पैठणी किंवा भरजरी साडी उत्तम राहील. यासोबत पतीला रेशमी कुर्ता-पायजमा ट्राय करता येईल.

हेही वाचा –

वेस्टर्न लुक –

वेस्टर्न कपड्यांमध्ये डिझायनर गाऊन किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेस ट्राय करता येईल. तर पुरुषांनी बायकोला ट्विनिंग करण्यासाठी फॅशनेबल जॅकेट किंवा स्टायलिश शर्टसोबत फॉर्मल पॅन्ट ट्राय करावी.

ऍक्सेसरीज –

पारंपरिक लूकवर पारंपरिक दागिने साडीवर घालता येतात. मोत्याचे दागिने, सोन्याचे दागिने घालता येतील. तर कुर्ता पायजम्यावर साखळीचे घड्याळ घालता येतील त्यासोबत कोल्हापूरी चप्पल घालायला विसरू नका. तुम्ही वेस्टर्न आऊटफिट घालणार असाल तर हिऱ्यांचे पेडेंट घालता येईल. वेस्टर्न गाऊनवर हिल्स तर पुरुष चप्पल घालू शकतात.

हेही वाचा – Bhaidooj Gift Ideas : भावा-बहिणीला भाऊबीजेला द्या हे युनिक गिफ्ट्स

Comments are closed.