कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार, मृताच्या अवयांची तस्करीचा आरोप, डॉक्टरांचा जामीन फेटाळला


अहिल्यानगर : कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवणे, मर्जीविरोधात रुग्णालयात दाखल करून ठेवणे, आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणे या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या अहिल्यानगरच्या डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. खासगी रुग्णालयाचे डॉ. गोपाळ बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर असे त्या डॉक्टरांची नावे आहेत.

डॉ. गोपाळ बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी  यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

कोरोना झाल्याचे भासवून 79 वर्षीय वृद्धावर चुकीचे उपचार केले, त्यामुळे त्या वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला होता. मृत बबनराव खोकराळे यांच्या मुलगा अशोक खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Doctor Bail Rejected : मृताच्या अवयवांची तस्करी केल्याचा आरोप

शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये 13 ऑगस्ट 2020 ते 23 नोव्हेंबर 2020 या काळात हा प्रकार घडला होता. मात्र पाच वर्षांनी न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला माहिती न देता मृतकाच्या अवयवांची तस्करी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा गंभीर आरोप खोकराळे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.